देवाडा (बुज.) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वाटप

देवाडा (बुज.) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वाटप

देवाडा (बुज.) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वाटप

✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
9511620282

पोंभुर्णा : – आज पोंभुर्णा तालुक्‍यातील देवाडा (बुज.) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वितरण कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलो. यानिमित्तानं बालगोपाल विद्यार्थीमित्रांना शालेय गणवेशासह नोटबुकचेही वितरण केले.
यावेळी माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख, सरपंचा सौ. माधुरीताई चुदरी, मुख्याध्यापक शंकर आत्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवनाथ मिसार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, नैलेश चिंचोलकर, तुळशीराम रोहणकर, उपसरपंच अशोक मांडवगडे,जुनगावचे सरपंच राहुल पाल, थवाजी धोटेकर, प्रमोद आरेकर, चेतन आरेकर, भोजराज मिसार, सत्यवान पगडपल्लीवार, विकास शेडमाके, सुनिल सोपनकर, सौ. सौ. सर्जनाताई मेश्राम, सौ. आशाताई तोडासे, सौ. संगीताताई बदन, सौ. कल्पनाताई राऊत सौ. सुमित्राताई आरेकर आदिंसह मोठ्या उत्साहात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी आवर्जून उपस्थित होते.

याठिकाणी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाचं शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिंनी कु. भाग्यश्री बदन हिने प्रमुख पाहुण्यांसाठी इंग्रजीत सुंदर आणि सुस्पष्ट वेलकम स्पीच दिली. त्याबद्दल त्या चिमुकलीचे भरीव कौतुक केले.

खरेतर, मी देखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो त्यामुळे जि. प. शाळांतून मिळणारे शिक्षण हे किती सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी असते याचा शिक्षणानुभव मलाही आहे. आणि गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन हा देखील आता बदलत आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत आहे. आणि त्याची प्रचिती भाग्यश्रीच्या आजच्या इंग्रजीतील सुमार भाषणानेही आपल्याला आली. मी जिल्हा परिषदेचा शिक्षण समिती सभापती व पुढे अध्यक्ष असतांना मिशन नवचेतना व नवरत्न स्पर्धा यांसारख्या अनेक शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना आम्ही सुरू केली. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांसह आज इथे मोठ्या संख्येने असलेल्या देवाडावासीयांची उपस्थिती दाखवून देत आहे.
या क्षेत्राचा सदस्य म्हणून देवाड्याच्या विकासासाठी मला अनेक विकासात्मक कामे पूर्ण करता आली. आज शाळेच्या मुख्याध्यापकांनी व ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या व गावाच्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांसाठी अनेक मागण्या केल्या. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून निश्चितच मी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here