भाजपा भोर शहर अध्यक्ष पदी पंकज खुर्द यांची निवड

चंद्रकांत जाधव

भोर प्रतिनिधी

      भोर तालुका भाजपा या पक्षाच्या भोर शहर अध्यक्ष पदी पंकज खुर्द यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भारतीय जनता पार्टी भोर शहर अध्यक्ष पदी सचिन मांडके हे कार्यरत होते त्यांची जिल्हा कार्यकरणीवर चिटणीस पदी नियुक्ती झाल्याने भोर शहर अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली त्यारिक्त जागेवर पंकज खुर्द यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे पुणे ग्रामीण दक्षिण यांनी दिले.     

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रभारी राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी, तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) मधील १४ मंडलांची निवड केली आहे. असे ही काळे यांनी सांगितले.

  भोर शहर भारतीय जनता पार्टी च्या अध्यक्ष पदी पंकज खुर्द यांची निवड झाल्याने भोर शहर व परिसरातून खुर्द यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here