स्वतंत्र भारतात ग्रंथालयांस लोकाभिमुख करण्याचे कार्य रंगनाथन यांनी केले – प्रफुल्ल राठोड

गोपाल नाईक 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

मो 7499854591

नांदेड : शियाली रामामृत रंगनाथन अय्यर हे गणिताचे प्राध्यापक होते . परंतु ग्रंथालय शास्त्रातील आवडीमुळे त्यांची ग्रंथपालपदी निवड करण्यात आली. त्यांनी ही निवड सार्थकी करीत ग्रंथालयास लोकाभिमुख करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले” असे गौरवोद्गार बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांनी व्यक्त केले.

     दि.२७ सप्टेंबर रोजी श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. काशिनाथ राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार ज्ञानस्त्रोत केंद्राचे सहायक शेख खलिल यांनी व्यक्त केले.

      महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गुरनुले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ दिनेश व्हिजीगिरी, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धरमसिंग जाधव, इतिहास विभाग प्रमुख डॉ. दत्ता जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इकबाल खान, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विलास राठोड, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here