वाडीवऱ्हे येथे स्वच्छता रन उत्साहात ग्रामपंचायत वाडीवऱ्हे अंतर्गत येथील दिव्यांगांना पाच टक्के दिव्यांग निधी धनादेश वितरण 

मिडियावार्ता 

इगतपुरी प्रतिनिधी 

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद विभाग तसेच पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रन, महिला रॅली व लेझीम पथक रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर, उप मुख्य कार्यकारी दीपक पाटील अधिकारी यांनी केले.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून लेझीम पथकासह रॅलीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गावातील नागरीकांना स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. तसेच, मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश पालखीद्वारे गावात मिरविण्यात आला. ग्रामपंचायत वाडीव ऱ्हे येथील दिव्यांगांना पाच टक्के दिव्यांग निधी धनादेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते देण्यात आला. मारुती मंदिरात आयोजित कार्यक्रमात , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) दिपक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड गायकवड यांनी स्वच्छता रन मध्ये गावातील नागरीकांसोबत सहभाग नोंदविला. तद्नंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत वाडिवऱ्हे येथील सफाई मित्रांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी हॅण्डवॉश लिक्विड देऊन सत्कार करुन त्यांच्या कार्याबद्यल सन्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.भुसावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, विस्तार अधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्होळे, सरपंच रोहिदास कातोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातीलकिशोर शिरसाळे, सचिन गवळी, राजेश मोरे , विशाल हांडोरे, तालुका कक्षातील राहुल नाईक, श्रीमती बगाड, तसेच पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक शिक्षक,शिक्षीका, अंगणवाडी सेविका व मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here