१३ वी राष्ट्रीय पेनकाक सिलाट मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगडच्या अर्णव रावकर ने पटकावला रौप्य पदक

12

१३ वी राष्ट्रीय पेनकाक सिलाट मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगडच्या अर्णव रावकर ने पटकावला रौप्य पदक

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

रायगड/ नागोठणे :- १३ वी राष्ट्रीय पेनकाक सिलाट मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा दि. २६-२८ सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्नाटकातील कोप्पल येथे पार पडली. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील अर्णव रावकर याने या क्रीडा प्रकारामध्ये घवघवती यश मिळवून रौप्य पदक पटकावला आहे. अर्णव पाचवी मध्ये हा क्रीडा प्रकार शिकत आहे . जानेवारीपासून तो ह्या स्पर्धेची तयारी करत होता. त्यांनी केलेल्या दिवस-रात्र मेहनतीचे हे फळ आहे. यासाठी गुरु धनंजय जगताप यांचे विशेष आभार घरातील मंडळींनी व्यक्त केले आहे. तसेच घरातील कुटुंबियांच्या पाठिंबा शिवाय हे शक्य झाले नसते अशी भावना अर्णवणे व्यक्त केली.
या कार्यक्रमात प्री-टीन, ज्युनियर आणि सिनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपसह विविध श्रेणींचा समावेश होता आणि त्याला इंडियन पेनकाक सिलाट फेडरेशन (IPSF) कडून पाठिंबा मिळाला होता.