Home latest News चळणी ग्रामपंचायत हद्दीत भात वाणावरील कार्यक्रमाला मोठी गर्दी
चळणी ग्रामपंचायत हद्दीत भात वाणावरील कार्यक्रमाला मोठी गर्दी
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, डहाणू
7798185755
डहाणू :- डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चळणी येथे हाई-रीच सिडस कंपनीतर्फे भात पीक पाहणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कंपनीच्या MDR -4001 या प्रोडक्टविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या वाणाचे 90 ते 100 दिवसांचे आयुष्य, भाताचा चांगला फुटवा तसेच भरघोस उतारा या वैशिष्ट्यांमुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला 700 ते 800 शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. भात कापणीचे दिवस जवळ आल्याने कंपनीतर्फे शेतकऱ्यांना विळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची सुविधा करण्यात आली.या कार्यक्रमासाठी माजी सभापती राम ठाकरे, लोकनियुक्त सरपंच सरिता भोये, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अजित पाचकुडवा, कंपनीचे रीजनल मॅनेजर (RM) राहुल पवार, प्रतिनिधी संदीप अनारसे, पालघर टेरीटरी मॅनेजर चेतन मोरे, हाई-रीच सिडस प्रतिनिधी गणेश पडवले, तसेच आजय निकोले उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे MDR 4001 वाणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली असून भविष्यात या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा आहे.
कोट-
पीक पाहणी झाल्यानंतर MDR 4001 हे वाण चांगले असल्यामुळे जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करू.
– सरिता भोये-ग्रुप ग्रामपंचायत चळणी सरपंच
कोट-
MDR 4001 हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावे, कारण हे अधिक उत्पादनासाठी उपयुक्त आहे.
– राहुल पवार- रीजनल मॅनेजर
कोट-
मागील वर्षापेक्षा या वाणाला अधिक उत्पादन आहे.
-दामा मस्कर (चळणी गेठीपाडा),शेतकरी