नवी मुंबईतील नागरी समस्यांवर वनमंत्री श्री.गणेश नाईक यांची बैठक.

11

नवी मुंबईतील नागरी समस्यांवर वनमंत्री श्री.गणेश नाईक यांची बैठक.

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

वाशी :- नवी मुंबई शहरातील प्रभागांमधील विविध प्रलंबित नागरी समस्या आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सिडको प्रदर्शनी केंद्रातील सभागृहामध्ये आज महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

आगामी काळातील येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ही बैठक नाईक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील प्रलंबित नागरी कामांची आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देत, या कामांना गती देण्याची मागणी केली. या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे पूर्णत्वास नेण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीवजी नाईक, माजी महापौर सागरजी नाईक, जयवंतजी सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथजी भगत, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतारजी यांच्यासह विविध प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.