सरदार पटेल महाविद्यालय येथे पर्यावरण शास्त्र विभागातर्फे पीएम उषा अंतर्गत सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचे आयोजन

12

सरदार पटेल महाविद्यालय येथे पर्यावरण शास्त्र विभागातर्फे पीएम उषा अंतर्गत सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचे आयोजन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 सप्टेंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाद्वारे पीएम उषा अंतर्गत दहा विविध विषयांवर 23 जुलै ते 18 सप्टेंबर पर्यंत सॉफ्ट स्कील,( युनिट २ व युनिट ३) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पीएम काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, विषयातील तज्ञ श्रीमती मोहिनी पुनसे, श्री. देवानंद कुसुबे, विभाग प्रमुख डॉ.कविता रायपूरकर, प्रा. डॉ. राहुल कांबळे तसेच इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणांतर्गत मातीचे नमुने घेणे आणि विश्लेषण, ग्रामीण शाश्वत विकासासाठी सहभागी शिक्षण आणि कृती, शाश्वत भविष्यासाठी अक्षय ऊर्जा संसाधने, पर्यावरणीय प्रदूषकांचे मूल्यांकन करण्यासाठी विश्लेषणात्मक उपकरण तंत्रज्ञान, जैवविविधता संवर्धन आणि व्यवस्थापन, एकल वापराच्या प्लास्टिकचे व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन, सांडपाणी विश्लेषण, हवामानशास्त्र निरीक्षण आणि वायू प्रदूषण निरीक्षण यावर प्रशिक्षण. या दहा विषयांवर सदर विषयातील तज्ञ व्यक्तींनी सखोल मार्गदर्शन केले. तज्ञ व्यक्तीमत्वाद्वारे या प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने हँडस ऑन ट्रेनिंग देण्यात आले. कौशल्य विकास विद्यार्थी तयार करणे हा उद्देश लक्षात घेऊन तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी ते करिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. कविता रायपूरकर, प्रा. डॉ. राहुल कांबळे, प्रा. पायल बांबोळे, प्रा. श्रद्धा आमगावकर, प्रा. सोनल पुणेकर, प्रा. प्रतिज्ञा चाहारे, राजेंद्र वालदे, प्रमिला रंगारी यांनी प्रयत्न केले. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरडीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार व सदस्य राकेश पटेल, एन रमजान, सगुनाताई तलांडे व कार्यकारणी सदस्य सुरेश पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही माध्यमशेट्टीवार, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कविता रायपूरकर तसेच विभागातील इतर प्राध्यापक यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.