स्वस्थ नारी, सशक्त परिवार उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर पडलं पार

13

स्वस्थ नारी, सशक्त परिवार उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर पडलं पार

पनवेल तालुक्यातील आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचं केलं आयोजन.

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल/ आजिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा समर्पण पंधरवडा निमित्त शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलं .
पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आजिवली या ठिकाणी या शिबिराचे नियोजन करण्यात आलं होतं. शिबीराच उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यचं उपचार निराकरण वेळीच झालं पाहिजे यासाठी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे नेहमीच तत्पर असतात असेही भगत यांनी यावेळी म्हटले. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वरदान ठरले आहेत. सर्व प्रकारच्या तपासण्या याठिकाणी याबवण्यात आल्या होत्या.
या शिबिर प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राजेंद्र पाटील, आनंद ढवळे, अनेश ढवळे श्री.समीर वाठरकर BDO पनवेल, डॉ.मनिषा विखे HDO रायगड, डॉ. नील मॅडम, आरोग्य कर्मचारी वर्ग तसेच भूपेंद्र पाटील अमित जाधव, संजय पाटील (सरपंच, कसलखंड), अश्विनी जितेश शिसवे (सरपंच ,कोन) , गुलाब रामदास वाघमारे (सरपंच मोठे भिंगार), तानाजी पाटील (सरपंच), जगदीश पवार(माजी पंचायत समिती सदस्य),अतुल घरत, अक्षय घरत, दीपक म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे (कामगार आघाडी), मंगेश वाकडीकर, सुनील गवंडी, वसंत काठावले, गोविंद पाटील, आप्पा भागीत (ओबीसी अध्यक्ष), योगेश लहाने ( भिंगारवाडी) सतीश पाटील ( भिंगार )ज्ञानेश्वर पाटील (भिंगार )मिलिंद सुरते, नासिर शेख, अनंत बुवा पाटील, अविनाश गाताडे, परशुराम माळी आदी उपस्थित होते.