पनवेल मधून पूरग्रस्त बांधवांसाठी आयोजित मदत संकलन उपक्रम

16

पनवेल मधून पूरग्रस्त बांधवांसाठी आयोजित मदत संकलन उपक्रम

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने घेतला पुढाकार.

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल: जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल येथे पूरग्रस्त बांधवांसाठी आयोजित मदत संकलन उपक्रमाला आमदार श्री.प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करून बांधवांसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
तसेच श्री. प्रितम म्हात्रे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन केले असून, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस श्री. नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष श्री. सुमित झुंजारराव, नवीन पनवेल शहर अध्यक्ष श्री. दशरथ म्हात्रे, मा. नगरसेविका सौ. सुरेखा मोहोकर आणि पनवेल शहर सरचिटणीस श्री. रुपेश नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजातील गरजू बांधवांसाठी संस्थेने घेतलेला हा उपक्रम पूरग्रस्तांना पाठबळ देणारा आहे.