यवतमाळ जिल्हात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार


यवतमाळ जिल्हतील धामणी या गावात पाच वर्षीय चिमुकलीवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

प्रतिनिधी
यवतमाळ:-  जिल्हतील धामणी या गावात पाच वर्षीय चिमुकलीवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणारे पिडीत बालिकेचे आईवडील कापूस वेचणीच्या कामाला शेतात गेले होते, तर पिडीत मुलगी आपल्या सात वर्षीय मोठ्या बहिणी सोबत घरी होती. दरम्यान, मोठी बहिण बाहेर खेळायला गेली होती तर पिडीत बालिका टिव्ही बघत घरी होती. याचवेळी आरोपी बंडू पांडूरंग भडके वय 40 वर्ष याने पिडीत बालिका घरात एकटी असल्याचे दिसताच बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला आणि पळून गेला.

संध्याकाळी आईवडील शेतातून कामावरुन परत आल्यावर पिडीतेने आपबिती कथन केली. आईवडीलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसानी आरोपीला अटक केली असून कार्यवाही सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here