उपविभागिय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा सत्कार.उपविभागिय अधिकारी डाँ निलेश सत्कार करताना महा ई सेवा केद्र संघषँ कॄती समिती
सिद्धार्थ पाटिल प्रतिनिधी
अकोला :- महसूल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा महा ई सेवा केद्र संघषँ कॄती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोविड19 च्या या महामारीत जिल्हयातील विविध कोविड सेंटर उभारणे ; प्रशासकीय आदेश प्रसारीत करणे ; रूग्णांच्या तपासन्यांपासून उपचारापयँत मदत करून लाँकडाऊन काळात परप्रांतीय मजूरांची व्यवस्था करत अनेक उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोवीड19 योध्दा म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनिष तिवारी ; सरचिटणिस अभिजीत पाटील ; सोशल मिडीया प्रमूख शिवशंकर पाटील ; उपाध्यक्ष विनोद गवर आदी उपस्थीत होते.