व्हॉट्सअॅप वरील ग्रुपमधून बाहेर केल्याने, अॅडमिनवर हल्ला.
प्रतिनिधी
नागपूर :- व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर केल्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनवर हल्ला करण्यात आला. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर नागपुर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रमणी यादव 50, सिंधी कॉलनी, वैशालीनगर नागपुर आणि छत्रपती यादव 49 अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मेश्राम पुतळा चौक परिसरात घडली.
सुनील करमचंद अलीमचंदानी मेश्राम पुतळा चौक, सदर असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. सुनील आणि चंद्रमणी हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील यांनी दोन
व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. यात आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही होते. मात्र, या दोघांनी काही दिवसांपूर्वी काही मेसेजवर आक्षेप घेतला. यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही ग्रुपमधून काढून टाकले. रागाच्या भरात आरोपींनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यलयाजवळ बोलावले. तेथे त्यांच्यावर छन्नीने प्राणघातक हल्ला केला. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.