नागपुर सावकाराकडून कर्जदार महिलेवर बलात्कार.

घेतलेले कर्ज फेडण्यास उशिर झाल्याने, 40 वर्षीय महीलेवर सावकाराकडुन करण्यात आला बलात्कार


प्रतिनिधी
नागपूर :- सावकाराचे घेतलेले कर्ज फेडण्यास उशिर झाल्याने एका सावकाराने कर्ज घेण्या-या महिलेवर बलात्कार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नरेश चेतराम चोकसे वय 60 राह मोदी पडाव, कामठी असे आरोपी सावकाराचे नाव आहे. पीडिता 40 वर्षीय महिला शेतमजूर असून ती पती व मुलीसह राहते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती आर्थिक अडचणीत होती. घरी पैशांची नितांत गरज असल्याने तिने आरोपीकडून 10 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र टाळेबंदीमुळे सहा महिने हाताला काम नसल्याने ती व तिचे पती बेरोजगार होते. यामुळे कर्ज फेडण्यास त्यांना विलंब झाला. पण, आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. एक दिवस कर्जवसुलीच्या नावाने तो घरात शिरला व तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here