6 वर्षीय चिमुकलावर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास.

सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारवास, आणी 2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोकावली आहे.मुकेश चौधरी
वर्धा:- 6 वर्षीय चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याच परीसरातील एका नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या नराधमास काल वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारवास आणी 2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच शासनाकडून पिडितेला 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हा निर्वाळा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-2 मृदुला भाटीया यांनी दिला.

सुरेश गोंविद मुनेश्वर वय 25 रा. बरबडी असे नराधम आरोपीचे नाव आहे. पिडित चिमुकली मुलींसोबत घरासमोर खेळत होती. खेळून घरी परतल्यानंतर तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसून आल्याने घरच्यांना चांगलाच धक्का बसला. याबद्दल तिला विश्वासात विचारणा केली असता पिडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन चिमुक लीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर डॉक्टरांनी लैंगिक गैरप्रकार झाल्याचे सांगितले. सेवाग्रामचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर यांनी याप्रकरणाचा सखोल तपास करुन पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक केली.

या अत्याचार प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शासनाव्दारे 11 साक्षिदार तपासण्यात आले. शासकीय अभियोक्ता जी.व्ही. तकवाले यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-2 मृदुला भाटीया यांनी आरोपी सुरेश मुनेश्वर याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार गांजरे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here