समाज कल्याण सभापती यांनी केली विकास कामाची पाहानी.
शासनाने नाधवडे बौद्धवाडी स्मशान शेड, बौद्धवाडी स्ट्रीट लाईट मंजुरी दिली आहे.
रोहित पावसकर प्रतिनिधी
सिंधूदुर्ग:- आज समाज कल्याण सभापती शारदा कांबळे मॅडम यांनी नाधवडे गावात भेट दिली. आणी सुरु असलेल्या विकास कामाची पाहणी केली.
नाधवडे गावात शासना तर्फे मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरु आहे. शासनाने नाधवडे बौद्धवाडी स्मशान शेड मंजुरी दिली असुन ते काम पण सुरु होणार आहे. नाधवडे बौद्धवाडी स्ट्रीट लाईट मंजुरी दिली असल्याने काम योग्य पध्दतीने कशा पद्धतीने करता येणार त्यामुळे आज समाज कल्याण सभापती शारदा कांबळे मॅडम यांनी नाधवडे गावात भेट दिली आणी मार्गदर्शन केल.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी सरपंच विष्णू (दादा) पावसकर, ग्रामसेवक नदाफ भाऊ, ग्राम पंचायत सदस्य राहुल इस्वलकर, संतोष यादव, रविन्द्र गुंड्ये, बाळकृष्ण पावसकर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.