*ठाणेदार च्या मध्यस्थीने दोन गटातील वाद मिटला*
*गावकऱ्यांनी मानले ठाणेदार साहेबांचे आभार*

*गावकऱ्यांनी मानले ठाणेदार साहेबांचे आभार*
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी – तालुक्यातील उंदीरगाव येथे दोन गटात विजयादशमी च्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुसता एक मेकांवर संसयामुळे वाद झाला
,म्हणतात ना की संशयामूळे होत्याच नव्हत होते , असाच एक प्रकार गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथे घडला …हि बाब धाबा येथील ठाणेदार सूशील धोकटे यांच्या कानावर पडताच त्यांनी सरळ उंदिरगाव गाठला आणि उंदिरगाव येथील पोलिस पाटील सौ कूसूम बारसागडे यांना घेऊन उंदीरगाव येथे चक्क मिटींग भरवली आणि दोन्ही गटातील लोकांची बोलावणी केली
अती संवेदनशीलतेने लोकांना समजावून सांगितले
त्या वेळेस ठाणेदार सूशील धोकटे म्हणाले की हा गावातील विषय आहे कोण काय केले कोण काय म्हणत या कडे आपणं लक्ष द्यायचे नाही आपण आपणच आहोत मि काय आज इथे ठाणेदार आहे उद्या बदली झाली की मी दुसऱ्या ठिकाणी जाणार त्या मुळे तुम्ही एकमेकांशी मिळून रहा …वाद करुन काय फायदा गावातील वाद हा पोलिस स्टेशन पर्यंत न येता गावातील पोलिस पाटील आणि तंटामुक्त समिती च्या माध्यमातून मिटवा शेवटी काय जरं कुणी मरण पावला तर तुम्हाला बांबू आणि दोरी आणावं लागते आणि कुणाच्या घरी लग्न असेल तरं तुम्हाला सहकार्य करावे लागते बोलले….. लोकांना समजेल अशा भाषेत अती संवेदनशीलतेने समजावून सांगितले तेव्हा दोन गटातील वाद मिटला आणि आता सर्व गाव एकमेकांशी आनंदाने वागत आहे
अशा या कर्तव्यदक्ष ठाणेदाराचे गावकरी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले आहे …आणी कौतुक केले आहे