स्टेशन मास्टरांनी घेतली मध्य रेल्वे रेल्वेच्या मुख्य परिचालन प्रबंधकाची भेट

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422
मुंबई : ‘अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ संघटनेचे झोनल पदाधिकारी विजय पाटील यांच्या नेतृत्वात काही स्टेशन मास्टरांनी विविध मागण्यांसाठी मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन प्रबंधक मुकूल जैन यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्य परिचालन प्रबंधक जैन यांच्याकडे सोपावले.
अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोशिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या निर्देशानुसार झोनल पदाधिकारी विजय पाटील यांच्या सहित इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य परिचालन प्रबंधक मुकूल जैन यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे स्टेशन मास्टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन सोपावले. या भेटी दरम्यान, मुख्य परिचालन प्रबंधक जैन यांनी स्टेशन मास्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पाटील यांना दिले आहे. तसेच यावेळी संघटनेचे मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काय आहेत स्टेशन मास्टरांच्या मागण्या ?
१) स्टेशन मास्टर कॅडरमध्ये रिक्त जागांची भर्ती करणे.
२) बंद करण्यात आलेला ‘रात्रपाळी भत्ता’ पुन्हा सुरू करावा.
३) ४६००/- ते ४८०० किंवा ४८००/- ते ५४००/- ग्रेड पेसाठी ‘एमएसीपी’ची यादी जारी करणे.
४) ‘मानवी दुर्घटना’ हाताळण्यासाठी नवे दिशा-निर्देश संशोधन करून जारी करणे.
५) दूरच्या रेल्वे स्टेशनवर कार्यरत स्टेशन मास्टरच्या कुटुंबासाठी स्टेशनजवळील शहराजवळ केंद्रीय आवासाची व्यवस्था करणे जेणेकरून त्यांना सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.