*पळसगाव खुर्द येथे नागभीड येथील न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन*

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी 94033 21731
नागभीड : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागभीड तालुक्यातील पळसगाव खुर्द येथे नागभीड येथील न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. देशात ७५वा अमृत
महोत्सव प्रसंगी दिवाणी व फौजदारी न्यायालय नागभिड अंतर्गत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मा. न्यायधिश साहेब यांच्या अध्यक्षते खाली विधीसेवा जन जागरण मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने कायदे विषयक सल्ला व मार्गदर्शन हा कार्यक्रम पडळसगाव खुर्द येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध प्रकारचे कायदे विषयक माहिती देण्यात आली. ज्या मध्ये अॅड. चौधरी सर यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा विषयी, तर अॅड. गुटखे सर यांनी वारसा हक्क कायदा, तसेच अॅड. उईके सर यांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायदा,तर ॲड. जैस्वाल (शिवणकर) मॅडम यांनी घरेलु हिंसाचार संरक्षण अधिनयम-२००५ विषयी माहिती सांगितली. तसेच मा. न्यायधिश साहेबांनी सर्व नागरिकांना कायदेशीर कर्तव्य” बाबत माहिती सांगितली. तसेच ॲड. सहारे सर, व ॲड.कामडी सर यांनीसुद्धा कयदे विषयक माहिती दिली. या कार्यक्रमात गावातील ग्राम पंचायत चे मा. सरपंच तसेच मान्यवर सदस्य, मा.पोलीस पाटील, तसेच तंटा मुक्ती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.