*दलित युथ पँथरच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निलेश मोहिते यांची निवड*

प्रतिनिधी – ७० च्या दशकात स्थापन झालेल्या दलित युथ पँथरचे कार्य त्यावेळच्या रिपब्लिकन नेत्याच्या दुहेरी वागणुकीमुळे वाढत गेले. संघटनेचे संस्थापक ज वी पवार व जेष्ठ नेते राजाभाऊ ढाले यांनी संघटन मजबूत केले. या संघटनेच्या संविधान दिनी झालेल्या सर्वसाधारण सभेत पँथर निलेश मोहिते यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दलित पँथरच्या सचिव व प्रवक्ते पदी कार्यरत असताना गेली ४ वर्षे ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांनी राज्यातील शोषित,पीडित दिन दलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने संघटनेच्या माध्यमातून उभ्या केलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल किंवा जातीवादी शक्तीच्या विरोधातील आंदोलने असो ते यशस्वीपणे पार पाडले आहे. म्हणून त्यांच्या या कार्याची कृतवाची दखल संघटनेने घेतली. आणि संघटनेला एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून संविधान दिनी सर्वसामान्यांना योग्य न्याय देईल असा चेहरा दिला आहे. पँथर निलेश मोहिते हे निष्ठावंत पँथर असल्यानेच त्याची राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असल्याने विशेष करून तरुण वर्गासोबत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here