औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एकाच कुटुंबातील तिघांची हत्या.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. कावसन गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एक आठ वर्षांची मुलगीही आहे. तर ६ वर्षांचा मुलगा बचावला आहे.
पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास हे हत्याकांड घडले. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून संभाजी निवारे यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, 8 वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यातून त्यांचा 6 वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.








