क्रांतीसुर्य, थोर समाजसुधारक माहात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी पुतळा परिसराची दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

47

क्रांतीसुर्य, थोर समाजसुधारक माहात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी पुतळा परिसराची दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

क्रांतीसुर्य, थोर समाजसुधारक माहात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी पुतळा परिसराची दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?
माहात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा परिसराची दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
हिंगणघाट:- स्थानिक नंदोरी चौक परिसरात माहात्मा जोतिबा फुले यांची अर्ध्या कृती पुतळा आहे. आज त्याची अवस्था फार दयनीय दिसून येत आहे, भारताच्या महान समाजसेवक असलेल्या माहात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची एक प्रकारची विटंबना केली जात आहे.

नंदोरी चौक परिसरात माहात्मा जोतिबा फुले यांची अर्ध्या कृती पुतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीच साम्राज दिसून येत आहे. जागोजागी नाल्यांचे पाणी वाहत आहे. त्या स्थिकानी डुकर झोपले असतात. घाण कचरा असल्यामुळे सर्वीकडे दुर्गंदी येत आहे. एका प्रकारे हे माहात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना आहे. असा आरोप हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश लाजुरकर यांनी व्यक्त केल्या आहे.

महापुरुषाचे पुतळे हे फक्त पुण्यतिथी आणि जयंती साजरी करण्यापुरते मर्यादित नसुन तर यांच्या नवीन पिढी साठी आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्या समोर उभ्या केलेल्या आहेत. ज्या ज्योतीबा आणि सावित्रीने या देशासाठी, महिलासाठी, सर्व मानवजाती साठी आपल सर्वच अर्पण केले आहे. याची जाणीव येथील नगरपालिका प्रशासनाने व या शहरातील प्रथम नागरिक म्हणून शहरांची धुरा ज्यांच्या शिरावर असते. त्या जिम्मेदार लोकांनी शहरातील प्रत्येक पुतळ्याची स्वच्छता व सुरक्षा करणं महत्त्वाचं आहे. या परिसरातील कोणत्याही प्रकारची दखल स्थानिक प्रशासनाने न घेतल्यास पुढील घटनेस येथील नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. असे आव्हान येथील वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजुरकर,वकेशव तितरे, अनिल कंडू, जयंत मानकर, अनिल भोगांडे, अनिल मडावी, प्रफुल गेडाम, दिलावर नारनवरे, पिपळशेंडे, संदेश मुन, रा .सु. बिडकर महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख रमेश भगत सर ह्यांनी केले आहे.