माहात्मा ज्योतिबा फुले एक महान समाज सेवक.

✒लेखीका : उषाताई कांबळे✒
राह. सांगली, जिल्हा सांगली
माहात्मा ज्योतिबां फुले देशातील एक अग्रणी समाज सेवक आज त्याच्या स्मृती दिन. हंटर कमिशनच्या समोर देशातील नागरिकाच्या सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतीक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याच महान असे काम करणारे आणि शिक्षणीक क्रांतीची ज्योत घराघरात पेटवणारे महान असे महात्मा ज्योतिबा फुले.
विद्धेविना मती गेली
मती विना नीती गेली
नितिविना गती गेली
गती विना शूद्र खच ले
इतके अनर्थ एका अविद्येने केलं..
स्त्री, शोषित आणि पीडित अस्पृशना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष नोंदवली होती. भारतीयाना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत 1882 ला सर विलीयस्म यांच्या अध्यक्षते खाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला त्यालाच हंटर आयोग म्हणतात. सर हंटर जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा पुण्यामधील एम. एम. कुंटे यांनी बहुजनाना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. मुलींना व अस्पुश्य लोकांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन करणे होय अशी बातमी सनातनी लोकांनी उठवली हा तर हिंदू धर्मा वर आघात आहे. अशी बातमी सनातनि लोक करू लागले.
तेव्हा एक क्रांतीच्या मशाली पेटवून तम्माम लोकाच्या शिक्षणाचा पाणा मिळावा, हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले ना हर नाही मानली आणि हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष नोदवली आणि त्या समोर म्हणाले 12 वर्ष वय असले ल्या मुलांना शिक्षण सक्तीचे करावे बहुजन शिक्षक शाळेत नेमले पाहिजेत. सरकार ने खेड्या पाड्यात शाळा स्थापन कराव्यात. स्त्रिया मध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाय योजना कराव्यात.
आदीवासी जाती आणि जमातीना प्राधान्य असावे. लोकेल्सस फंड या पैकीच जास्त भाग शिक्षणावर वर खर्च करावा. प्राथमिक शाळांना सरकारने भरपूर अनुदान द्यावे. प्राथमिक शाळानवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारीं नगर पालिकेने घ्यावी. शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहार उपयोगी शिक्षण म्हणजे. शेती, आरोग्य, इतिहास, भूगोल आणि यंत्रकी ज्ञान द्यावे. असा आग्रह हंटर कमिशन समोर धरला.
महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशन समोर असे म्हणतात की, ब्रिटिश यांचे शैक्षणिक धोरण त्यांना मान्य नाही उच्च वर्णीया साठी त्यांना भरपूर खर्च करत आहे. पण खेड्यातील लोकांसाठी खास प्रयत्न होत नाहीत शिक्षण असे असावे कि तरुना मध्ये स्वतःचा व्यवसाय करणेचे समर्थ निर्माण व्हावे.
मुंबई इलख्यात एक पण महार अथवा मांग मुलगा किंवा मुलगी महविद्यालयात काय तर माध्ममिक शाळेत हि नव्हती 1882 मध्ये हंटर अयोग पुढे मुंबईच्या खालोखाल 8 निवेदने पुण्यातून सादर झाली होती या पैकी महात्मा फुलेच निवेदन बहुजन समाजाच्या दृष्टीने जास्त सर्वात महत्वाचे मानावे लागते.
महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तिच आणि मोफत असावे या विचाराचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ज्योतिबा फुले यांनी क्रांतीला सुरुवात केली त्यामुळे आपला समाज मानाने सर्व प्रकारची शिक्षण घेत आहे. यामध्ये ज्योतिबा फुले यांच मोठं योगदान आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
जय भारत जय संविधान