नागपुर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कन्हान नदीत 3 तरुणांना जलसमाधी. ● एकाचा मृतदेह मिळाला, तिघांचा शोध सुरू. ● मौदा तालुक्यातील वढना येथील घटना

47

नागपुर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कन्हान नदीत 3 तरुणांना जलसमाधी.

● एकाचा मृतदेह मिळाला, तिघांचा शोध सुरू.
● मौदा तालुक्यातील वढना येथील घटना

नागपुर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कन्हान नदीत 3 तरुणांना जलसमाधी. ● एकाचा मृतदेह मिळाला, तिघांचा शोध सुरू. ● मौदा तालुक्यातील वढना येथील घटना
नागपुर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कन्हान नदीत 3 तरुणांना जलसमाधी.
● एकाचा मृतदेह मिळाला, तिघांचा शोध सुरू.
● मौदा तालुक्यातील वढना येथील घटना

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी

📲9923296442📲

नागपुर:- नागपुर जिल्हातून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. दि. 27 ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील कन्हान नदीच्या वढना गावाजवळील पात्रात 10 तरुण पोहायला गेले असता 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला त्यातील एकाचा मृतदेह मिळाला असुन दोघांच्या मृत्यूदेहाची शोध मोहीम सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमान नगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामींनारायन गोशाळेत पिकनिक बनविण्याकरिता आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास आले. गोशाळेला कन्हान नदीच्या पात्रात 10 तरुण मुले पोहण्याकरिता नदीत 5 वाजेच्या सुमारास पोहोचले. सर्व तरुण नदीत पोहण्याकरिता उतरले. परंतु पाण्याचा अंदाज ना आल्यामुळे खोल पाण्यात तीन तरुण बुडू लागले पाहता पाहता तीन तरुणाला जलसमाधी मिळाली.

कन्हान नदीच्या पात्रात 3 तरुण बुडाल्याची बातमी गावात पसरताच सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशांत राजाभाई पटेल वय 23 वर्ष नागपूर, मूळगाव तितलागड ओरिसा याचा मृतदेह मिळाला व अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण वय 21 वर्ष नागपूर, मुळगाव गौजुल, गुजरात. हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया वय 28 वर्ष नागपूर, मुळगाव अहमदाबाद गुजरात येथील राहणारे होते पोलिस निरीक्षक हेमंत खराबे, उपविभागीय अधिकारी श्याम मदुनरकर तहसीलदार मलिक वीरानी उपविभागीय पोलिस मुख्तार बागवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शोधकार्य करत आहे.