समता सैनिक दल सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे यांनी रक्क्तदान करून रुग्णाला दिले जीवनदान.

✒️ प्रशांत जगताप ✒️
कार्य संपादक मिडिया वार्ता न्यूज
📲 9766445348 📲
वर्धा:- कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे भरती असलेल्या प्रज्ञा फुलकर, रा.कवडघाट या गरोदर महिलेला रक्ताची नितांत गरज आहे अशी बातमी कळताच समता सैनिक दल सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे यांनी रुग्णालयात जाऊन गरजू रुग्णाला ताबडतोब रक्तदान करून जीवनदान दिले.
प्रदीप कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आतापर्यंत 35 वेळा रक्तदान केले आहे. त्यांची संपूर्ण जिल्ह्यात रुग्णमित्र म्हणून ख्याती आहे. ते दर तीन महिन्यानंतर गरजू रुग्णांना रक्तदान करतात आणि गरीब रग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. रक्तदान केल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा संघटक अभय कुंभारे, मार्शल दिपक हुके प्रामुख्याने उपस्थित होते.