युवक काँग्रेस कमिटी, विसापूर यांचे निवेदनास यश: प्रितम पाटणकर

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694
विसापूर:- मधील वॉर्ड 2 व्यायाम शाळेचे संडास बाथरूमचे बांधकाम मंजूर झाले असून लवकरच बांधकाम पूर्ण करून साहित्य देऊन व्यायाम शाळा सुरू होणार. चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर ता विसापूर गावामधील वॉर्ड 2 हनुमान मंदिर जवळील व्यायाम शाळेचे अर्धवट संडास बाथरूनमचे बांधकाममुळे मागील 3 ते 2 वर्षां पासून व्यायाम शाळेचे साहित्य नव्हते आले त्यामुळे व्यायाम शाळा सुरू झाले नव्हते म्हणून प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा अंतर्गत किशोर भाऊ पंदीलवार यांना निवेदन मार्फत कळविण्यात आले कि व्यायाम शाळेचे संडास, बाथरूम चे बांधकाम पूर्ण करून साहित्य देऊन व्यायाम शाळा सुरू करण्यात यावे. तसेच संडास बाथरूमच्या बांधकामा मंजूर करून दिले बद्दल किशोरभाऊ पंडिलवार (तह. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी) धन्यवाद दिले व गजूभाऊ पाटणकर (विसापूर ग्रामपंचायत सदस्य) यांचा मार्गदर्शनामुळ तसेच बांधकाम पूर्ण करून साहित्य देऊन व्यायाम शाळा सुरू करण्यात येणार.