बल्लारपूर रेल्वे स्थानक दुर्घटनेतील जखमींची आ. किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात घेतली भेट •घटनेची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची केली मागणी

बल्लारपूर रेल्वे स्थानक दुर्घटनेतील जखमींची आ. किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात घेतली भेट

•घटनेची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची केली मागणी

बल्लारपूर रेल्वे स्थानक दुर्घटनेतील जखमींची आ. किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात घेतली भेट •घटनेची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची केली मागणी

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर / बल्लारपूर : 28 नोव्हेंबर
बल्लारपुर रेल्वे स्थानक येथे घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालयात जाऊन आ. किशोर जोरगेवार यांनी भेट घेत उपचारादरम्यान सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आ. जोरगेवार यांनी केली आहे. पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल बल्लारपूर रेल्वे स्थानकावर घडली. जखमींपैकी ४५ वर्षीय निलीमा रंगारी या महिलेचा मृत्यु झाला आहे. दरम्याण आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सदर जखमींवर उपचार सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात जात जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत आ. जोरगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली आहे. यावेळी जखमींच्या नातलगांशीही आ. जोरगेवार यांनी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली. हा पादचारी पुल हा ४० वर्ष जुना होता. त्याची योग्य देखभाल केल्या गेली नाही. या पुलाबाबत तक्रारी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. ही मोठी चुक असुन याची चौकशी करत दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ. जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे. रेल्वे विभागानेही या प्रकरणाकडे गांर्भियाने लक्ष देत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी करावी, यासाठी एक पथक रेल्वे विभागाने तयार करावे अशी मागणीही आ. जोरगेवार यांनी केली असुन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आलेल्या तक्रारींकडे दूर्लक्ष करु नका अशा सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, राशेद हुसेन, रुपेश पांडे , नकुल वासमवार, हेरमन जोसेफ, रुपेश कुंदोजवार, सदनाम सिंग मिरधा, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवा पथकाच्या सदस्यांच्या उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here