रहदारीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करा उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांची मागणी.
संतोष उध्दरकर.
म्हसळा: म्हसळा शहरातील वाढती वाहतुक कोंडी, वाढती रहदारी पाहता तसेच म्हसळा नगरपंचायत जवळील जाणारा मार्ग, करंबे गल्ली, पोलीस ठाण्याकडे जाणारा मार्ग या ठिकाणी करण्यात येणारी अवैद्य वाहने पार्किगमुळे तसेच सततची या मार्गावर वाहतुक कोंडी यामुळे सामान्य नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता म्हसळा नगरीचे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांना निवेदन देऊन रहदारीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची तसेच रहदारीस मार्ग मोकळे करावे या संदर्भात निवेदान देऊन मागणी करण्यात आली, तसेच वाहतुक कोंडी, अनधिकृत पार्किंग,धुम स्टाईल दुचाकी चालविणे, या विषयावर चर्चा करण्यात आली,यावेळी उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, नगरसेवक निकेष कोकचा,नगरसेवक संजय दिवेकर, प्रसाद बोर्ले, स्वप्नील चांदोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.