नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सायकल वाटपात मोठा घोटाळा.

आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किमी अंतरापर्यंत राहणाऱ्यांना मुलींना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सायकल देण्यात येते. शिक्षण विभागाकडून तपासणी केली असता यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले.

 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मुलींना सायकल वाटप करण्यात येते. सायकल लाभार्थी मुलींना दुकानातून खरेदी करायची असून, नंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. या सायकल शाळा स्तरावरून खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच दिवशी व एकाच दुकानातून खरेदी करण्यात आल्याचे समोर आले. बिलावर जीएसटी क्रमांक नसल्याने यात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. काटोल आणि रामटेकच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किमी अंतरापर्यंत राहणाऱ्यांना मुलींना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सायकल देण्यात येते. वर्ष 2019-2020 मध्ये रामटेक व काटोल तालुक्याला 55.16 लाख रुपये देण्यात आले. सायकल खरेदीसाठी 3500 रुपये देण्यात येते. ही रक्कम डीबीटीच्या माध्यामातून थेट लाभार्थी मुलींच्या खात्यात वळती करण्यात येते. सायकल खरेदीसाठी दोन हजार आगाऊ रक्कम देण्यात येते. सायकल खरेदी व इतर कागदपत्र सादर केल्यावर 1500 हजार रुपये खात्यात जमा करण्यात येते.

शाळा मुख्याध्यापकांनी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वळती करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून तपासणी केली असता यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. लाभार्थ्यांच्या जोडलेल्या सायकल खरेदी पावतीवर जीएसटी क्रमांक नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे पावतीवर सायकलला फ्रेम नाही. सायकल नागपूर व तुमसर येथील एकाच दुकानातून एकाच दिवशी खरेदी करणे, कंपनीचा उल्लेख नाही, शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिकच्या दराने या खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here