हिंगणघाट रोहीचे 4 दिवसांचे पील्लू वणविभागाच्या स्वाधिन.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- रोही या प्रजाती चे ४ दिवसांचे पील्लू आज सकाळी वणविभागाच्या स्वाधिन करण्यात आले, काल दुपारी 2 वाजता हिंगणघाट पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतान पूर हद्दित गणेश भोयर यांच्या शेतात हरबरा निंधन करत असतांना दमछाक करत पिल्लू गणेश भोयर यांच्या शेतात आलं.गणेश भोयर यांनी ज्वलंत मून व पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष यांना हि माहिती दिल्यानंतर, ज्वलंत मून यांनी रिटायर्ड वणविभाग अधिकारी मेंन्ढे साहेब यांना फोन माहिती दिल्यानंतर ताबडतोब वन विभागाचे अधिकारी आले, व त्या पील्याला सुखरूप वर्धेच्या वणविभाच्या प्राणि संग्रहालयात नेले.या प्रसंगी गुणवंत कारवटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
