गाव तेथे राष्ट्रवादी या अभिनया अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वि विधानसभा मतदार संघात जनसंपर्क बैठक.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वर्धा:- गाव तेथे राष्ट्रवादी या अभिनया अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वि विधानसभा मतदार संघातील पिंपळखुटा या गावी आज दिनांक २६/१२/२०२० ला राष्ट्रवादीचे नेते मा. अभिजित दादा फाळके पाटील यांच्या नेतृत्वात लोकसंपर्क बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सोबत राष्ट्रवादीचे योगेश घोगरे,दिपक शेळके,समिर राऊत, शुभम उगेमुगे होते. या बैठकीचा प्रमुख उद्देश गावातील लोकांच्या समस्या समजून त्या निकाली काढणे व स्वाभिमानी आचार,राष्ट्रवादी विचार जनमनात रुजविणे होता.

या बैठकीचे आयोजन पिंपळखुटा येथील युवा तरुण कुणाल मते, ऋषी एकापुरें, अभिषेक एकापुरे, समिर एकापुरे, सुनील पोटे, दर्शन डोंगरे,सूरज नागपूरवार, ललित कुसळे, पंकज देशभ्रतार, अक्षय मडके,अकेश लाडे, रोहण कौरती,प्रशांत पट्टे, विजय धांदे, सूरज तेलमारे,तुषार देवगडे, निलेश मडके, निकेश क्षिरसागर, दर्शन डोंगरे, नितीन एकापुरे, हरिभाऊ जमिनकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:-
१) पोलिस भरती सराव मैदान.
२) स्पर्धा परीक्षा पुस्तक मागणी.
३)दूध संकलन केंद्र सुरू करणे.
४) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
५)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नेमणे.
६) धडक सिंचन योजना प्रलंबित कामे निकाली काढणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here