हिंगणघाट युवक काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलन

67

हिंगणघाट युवक काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलन

हिंगणघाट:-  येथील नॅशनल हायवे वरील संविधान चौक (कलोडे चौक) व सरकारी दवाखाना चौक येथे सातत्याने जड वाहनांची वर्दळ असते. या चौक प्रचंड रहदारीचा आहे रस्त्यावर बॅरीगेट्स नसल्यामुळे वाहने भर वेगाने चालतात त्यामुळे इथे अपघाताचे प्रमाण खुप प्रमाणात वाढले आहे त्वरित इथे बॅरीगेट्स किंवा ड्रम लावण्यात यावे असे निवेदन तहसीलदार आणि ठाणेदार यांना दिनांक 17/12/2020 ला निवेदन युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले होते. आणि निवेदनात दिलेल्या प्रमाणे हि समस्या सोडवली नाही तर रास्ता रोको आंदोनल करू असा इशारा देण्यात आला होता, तरी पण हि समस्या सोडविण्यात आली नाही आणि काही दिवसा आधी संविधान चौक (कलोडे चौक) येथे खुप मोठा अपघात झाला त्यामुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले तरी पण येथे बॅरिगेट लावण्यात आले नाही.

म्हणनु युवक काँग्रेस तर्फे निवेदनात दिलेल्या प्रमाणे आमदार मा. रंजीत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या मध्ये युवक काँग्रेस च्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे रोखला जो पर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत रास्ता रोको सुरु होता. याचे नेत्तृत्व युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष अमित चाफले यांनी केले. या वेळी उपस्थित युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष नकुल भाईमारे, विधानसभा उपाध्यक्ष पंकज पाके, विधानसभा महासचिव श्रीकांत देवलपल्लीवार, शहर अध्यक्ष अंकुश कुचनवार तालुका अध्यक्ष अज्जू शेख ,सलमान शेख गौरवं उरकुडे, शैलेश मैंद, प्रवीण कैकाडे, वीरेंद्र कांबळे, रजत शेख, रितिक मोघे, योगेश रामटेके, नयन पनत, अज्जू बारसागडे सुमित कळसकर, शुभम धाबे, अतुल कोरडे, राहुल चाफले, शुभम लोंढे, किशोर मेघरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.