यशवंत सेनेचा झंझावाती कोल्हापूर जिल्हा दौरा व यशवंत सैनिकांची आढावा बैठक.

कोल्हापूर:- यशवंत सेनेचे सरसेनापती माधव भाऊ गडदे यांचा 27/12/2020 रोजी कोल्हापूर जिल्हा दौरा व यशवंत सैनिकांची आढावा बैठक संपन्न झाली. दौऱ्याची सुरवात कोल्हापूर नगरीतील अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन झाली. जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक मान्यवर मंडळी समवेत चर्चा केली. खालील नियुक्त्या करण्यात आल्या. संजय काळे – जिल्हाप्रमुख, चंद्रकांत वळकुंजे – उपजिल्हा प्रमुख, संभाजी बन्ने -हातकणंगले तालुका संपर्क प्रमुख, अंकुश लांडगे -हातकणंगले तालुका प्रसिद्धी प्रमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सरसेनापती माधव भाऊ गडदे यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गाव तिथे शाखा झाली पाहिजे तसेच जिथे अन्याय होईल तिथे आक्रमक भूमिका घ्या.स्व बी के कोकरे यांनी जातीसाठी आपली संपूर्ण हयात घालवली त्यांच्या विचार प्रत्येक तरुणाने आत्मसात करण्याची गरज आहे.आरक्षणाचा मुद्द्यावर प्रत्येक जण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे पण यशवंत सेना आरक्षणाच्या मुद्यावर गप्प बसणार नाही तर येत्या काळात आणखी आक्रमक पवित्रा घेतला जाईल असेही माधव भाऊ गडदे यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख राजेश तांबवे यांनी सांगितले की,स्व.बी के कोकरे यांच्या विचारांशी प्रभावित होऊन सरसेनापती माधव भाऊ गडदे यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद सह सर्वच निवडणुकांमध्ये यशवंत सेना स्वबळावर लढणार आहे. यावेळी यशवंत सेना राज्य खजिनदार बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजीत कोकरे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ संदीप हजारे, माजी जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीबा पाटणे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ ललिता पुजारी, उपजिल्हा प्रमुख गंगाराम हजारे, जिल्हा संघटक तम्मा शिरोळे, हातकणंगले तालुका प्रमुख पै.राहुल माने, माजी जिल्हा संघटक वैभव हिरवे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख तसेच यशवंत सैनिक अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here