नगर परिषदेच्या खाली खुर्च्यांना नागरिकांनी घातले हार, सर्व अधिकारी रजेवर.

57

नागभीड नगर परिषदेच्या खाली खुर्च्यांना घातले हार/ काही दिवसापासून सर्व अधिकारी रजेवर.

नागभीड नगर परिषदेच्या खाली खुर्च्यांना घातले हार/ काही दिवसापासून सर्व अधिकारी रजेवर.
नागभीड नगर परिषदेच्या खाली खुर्च्यांना घातले हार/ काही दिवसापासून सर्व अधिकारी रजेवर.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभीड : – नागभिड-नगरपरिषदेची निवडणूक होऊन चार वर्ष सहा महिने लोटले परंतु या कालावधीत फक्त दीड वर्ष नागभिड नगर परिषदेला मुख्याधिकारी कायमस्वरूपी मिळालेला होता बाकी तीन वर्षापासून या नगर परिषदेला अस्थाई मुख्याधिकारी मिळालेला आहे. नागभिड नगर परिषदेमध्ये दहा गावांचा समावेश असून कार्यालयीन कामाकरिता आजूबाजूच्या गावातील लोकांना मुख्यालय यावे लागते .परंतु अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे नागरिकांची दमछाक होत आहे असा आरोप मनसे तालुकाध्यक्ष बंडू गेडाम यांनी केला आहे.

दिवसभर वाट पाहूनही कामे होत नसल्याने आल्या पाई नागरिक वापस जात असतात नागभीड नगरपरिषदेचे सिविल इंजिनियर अभिषेक शिंदे दोन महिन्यापासून सुट्टीवर असल्यामुळे नागरिकांचा घरकुल चा दुसरा हप्ता मिळाला नाही घरकुल लाभार्थ्यांची बिले रखडलेली आहेत. काही अधिकाऱ्यांच्या सततच्या रजेमुळे बाजार ओट्याचे काम संथगतीने सुरू आहेत तसेच पाणीपुरवठा विभागाचे व स्वच्छता विभागाचे अभियंता हे एक महिन्यापासून रजेवर आहे मनसे तालुकाध्यक्ष बंडू गेडाम व काँग्रेसचे नगरसेवक संजय अमृतकर हे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरपरिषद मध्ये गेले असता अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली होत्या त्यामध्ये बांधकाम विभाग विभाग, कर विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, आस्थापना विभाग, नगर रचनाकार विभाग, लेखा विभाग हेअधिकारी हजर नव्हते .त्यामुळे या खुर्च्यावर माल्यार्पण चढवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळेस मनसेचे तालुकाध्यक्ष बंडू गेडाम, गटनेता संजय अमृतकर ,माजी सरपंच जहांगीर कुरेशी ,रमेश ठाकरे पंकज काळबांधे,वृषभ खापर्डे, नगरसेविका सारिका धारणे, धनश्री काटेखाये उपस्थित होते. *नागभिड नगरपरिषदेचा कारभार तीन वर्षापासून अस्थायी अधिकाऱ्यांच्या हातात आहे .नगरपरिषदेवर कोणाचाच वचक नसल्यामुळे नगर परिषदेमध्ये अंदाधुंद कारभार चालू आहे. लोकांची कामे खोळंबली आहेत. त्यावर प्रशासनाने लवकर तोडगा काढा नाहीतर मनसे लवकरच आंदोलन करणार अशी घोषणा मनसे तालुकाध्यक्ष बंडू गेडाम यांनी केली आहे.