चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकारावर प्राणघातक हल्ला,आरोपी हे शिवसेनेचे पदाधिकारी .

58

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करा, ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाची मागणी

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करा  ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाची मागणी
पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करा
 ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाची मागणी

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले इलेक्ट्रॉनिक मिडिया TV 9 मराठीचे जिल्हा प्रतिनिधी निलेश डाहाट यांना काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांनी अवैध धंद्याबद्दल बातमी प्रकाशित केल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे विशेष.

आरोपी विक्रांत सहारे व पवन नगराळे यांच्या वर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मान. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मान. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार, मा.संदीप भस्के उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी, व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन प्रेषित केले.

आरोपींवर भा.दं.वि. कलम 307अन्वये गुन्हा दाखल करून अटक न केल्यास ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा प्रेषित निवेदनातून देण्यात आला. यावेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, सचिव गोवर्धन दोनाडकर , उपाध्यक्ष प्रा. शाम कंरबे ,जेष्ठ पत्रकार जीवन बागडे, नेताजी मेश्राम, सहसचिव महेश पिलारे, कोषाध्यक्ष प्रविण मेश्राम, शिवराज मालवी, दिवाकर मंडपे, नंदू गुड्डेवार,दत्तात्रय दलाल,प्रशांत डांगे, विनोद दोनाडकर, रवि चामलवार,संतोष पिलारे, रुपेश देशमुख,व अन्य पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारला महाराष्ट्र पत्रकार संघाने नगरपालिका चौकात तीव्र निषेध व्यक्त करून भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना तहसीलदार संजय
राईंचवार यांच्यामार्फत निवेदन देऊन हमले खोरांरावर कठोर कारवाई करून पत्रकारावरील कायद्याचे पालन करावे अशी विनंतीही करण्यात आली यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर जी पांढरे तालुका अध्यक्ष रमेश निषाद सदस्य प्रशांत भोरे पारीश मेश्राम सह महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य गण यांची यावेळी उपस्थिती होती