एक निष्ठावंत नेता हरपला…. केंद्रीय मंत्री रामदास आठवले
✒️संदेश साळुंके
नेरळ रायगड प्रतिनिधी
📞9011199333
लोको पायलट प्रकाश गंभीरराव पगारे हे दलित पॅंथर चे ज्येष्ठ नेते तसेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कामगार नेते, रिपब्लिकन कामगार युनियन नेते पद भूषविणारे होते यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. अत्यंत हुशार व्यकीमत्व, जनसेवा, समाज सेवा करणे हे त्याच्या नसानसात होते.
गेले 12 दिवस ठाणे येथील जुपिटर रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते तर दि. 28 डिसेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या पश्चात पत्नी रूपलता, मुलगी डॉ. प्राजक्ता स्वराज,ऐश्वर्या साळुंके, श्रद्धा व मुलगा प्रतीक असा परिवार आहे. त्यांच्या धाकट्या भावाचे निधन मागील वर्षी झाल्याने त्याचा धसका त्यांनी घेतला असावा असे बोलले जात आहे.
त्यांच्या निधनाने समस्त नेरळकर तसेच सर्व चळवळीचे कार्यकर्ते यांना खूप धसका लागला असून एक निष्ठावंत नेता हरपला असे केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन द्वारे सांत्वन केले.
नेरळ येथील स्मशान भूमी दुपारी 2.45 मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर अग्नी देण्यात आली. यावेळेस रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दया बहादुर तसेच आंबेडकर चळवळीचे नेते राम गायकवाड, साहित्यिक लक्ष्मण अभंगे, राहुल डाळिंबकर उत्तम शेठ तसेच नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य व असंख्य लोक उपस्थित होते. तसेच शोकसभा व पुण्यानुमोदन दिंनाक 31 डिसेंबर रोजी 11 वाजता नेरळ येथे आहे.