राष्ट्रीय महामार्गावर पळसदरी मार्गात मोठे खड्डे; रस्ता करण्यास शेतकऱ्यांचा संतप्त विरोध

51
राष्ट्रीय महामार्गावर पळसदरी मार्गात मोठे खड्डे; रस्ता करण्यास शेतकऱ्यांचा संतप्त विरोध

राष्ट्रीय महामार्गावर पळसदरी मार्गात मोठे खड्डे; रस्ता करण्यास शेतकऱ्यांचा संतप्त विरोध

राष्ट्रीय महामार्गावर पळसदरी मार्गात मोठे खड्डे; रस्ता करण्यास शेतकऱ्यांचा संतप्त विरोध

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत : – कर्जत ते खोपोली व्हाया पळसदरी मार्गावर वर्णे येथे वाहन चालवताना अतिशय खडतर प्रवास करावा लागत आहे. मोठ मोठे खड्डे असलेला हा रस्ता एम.एस.आर.डी.सी. अंतर्गत तीन वर्षापूर्वी पूर्ण झाला असला तरी ठराविक ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने त्या ठिकाणचा रस्ता झालेला नाही. २०११ साली एम.एम.आर.डी.ए. मार्फत भूसंपादन करताना शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे फक्त आश्वासन देऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु बाधित शेतकर्यांनी सदर जागेत रस्ता करण्यास विरोध केल्याने नागरिकांना खड्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक तसेच शेतकरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा संतप्त सवाल करीत आहेत.

एम.एस.आर.डी.सी. माध्यमातून शहापूर -मुरबाड -कर्जत -हाल असा काँक्रीटीकरण युक्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८/अ गेल्या तीन वर्ष आधीच काही त्रुटी वगळता पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले होते. अपवाद म्हणजे पळसदरी मार्गातील वर्णे, पळसदरी, तलवली, हाल, नावंढे या ठिकाणी शेतकऱ्यांना जागेचा मोबदला न मिळाल्याने सदर ठिकाणचा रस्ता करण्यास संबधीत ठेकेदार असमर्थ ठरले. आणि त्या ठिकाणचे काम अर्धवट ठेऊन ठेकेदाराने पसारा आटोपला.
मात्र सध्या वर्णे या ठिकाणी खुप मोठे खड्डे असून तासी ८० च्या गतीने आलेली गाडी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने खड्ड्यात आपटतात त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत.

यामध्ये तब्बल १२ गावातील २५६ शेतकरी बाधित असून कुणालाच पैसे मिळाले नाहीत. विलास कृष्णा महाब्दी(मु.वर्णे), प्रवीण हडप (मु.नावंढे), चंद्रकांत यशवंत शिंदे (मु. पळसदरी), राजेश मारुती देशमुख (मु.वर्णे), रमेश गजानन देशमुख (मु.वर्णे),सौ.अश्विनी अशोक दळवी (मु.मानकीवली)
या शेतकऱ्यांनी संबधीत विभागाला काम करू न दिल्याने राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. खोपोली ते कर्जत असा रोजचा प्रवास वाहनाने करणारे नागरिक भयंकर त्रस्त झाले असून ही समस्या लवकर सोडवावी अशी आशा लाऊन बसले आहेत.

***********
एम.एम.आर.डी.ए. मार्फत भूसंपादन करून आमच्या विभागाकडे काम. करण्यास पाठवणे गरजेचे असताना अजूनही एम.एम.आर.डी.ए. मार्फत भूसंपादन न झाल्याने सदर शेतीमध्ये काम करता येत नाही. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रकरण अर्धवट अवस्थेत आहे.

संदीप पाटील,
कार्यकारी अभियंता रायगड
एम.एस.आर.डी.सी.

*********

एम.एम.आर.डी.ए. चे अधिकारी संजय मुखर्जी यांच्या सोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

************

बाधित शेतीचा पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही रस्त्याचे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा डागडुजी करून देणार नाही.शासनाने आमच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर मोबदला द्यावा.

विलास कृष्णा महाब्दी
स्थानिक शेतकरी
******************