माणगांव येथील बँक ऑफ इंडिया च्या वरती असणारे वोडाफोन आयडिया मोबाईल टॉवरला भीषण आग,  आगीत कोणतेही जीवितहानी नाही

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

📞8080092301📞

माणगांव :- माणगांव शहरात अनंत बिल्डिंग तसेच बँक ऑफ इंडिया टेरेसवर असणाऱ्या वोडाफोन आयडिया मोबाईल कंपनीच्या टॉवरला आज दि 28 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने माणगांव बाजारपेठेत एकच खलबल माजली.

या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ लहागे, पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर,पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, यांच्या सह माणगांव पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली आग विझविण्याचे काम शर्तीचे सुरु झाले त्यानंतर माणगांव नगर पंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उप नगराध्यक्ष राजेश मेहता माणगांव नगर पंचायत चे मुख्याध्याकारी संतोष माळी नगरसेवक दिनेश रातवडकर, शिवसेना नगरसेवक अजित तार्लेकर व आपत्कालीन टीम व अग्निशमन दल वाहन दाखल झाली ठिक 12.30 वाजता आग आटोक्यात आणली ही आग विझविण्यासाठी प्रथम माणगांव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराज बाडे, निलेश कदम व पोलीस ठाण्याचे निवास साबळे यांनी प्रथम जाऊन टॉवर चे इंजिन बंद केले व बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सद्यस्थांना बाहेर काढले जेणेकरून कोणतेही जीवितहानी होऊ नये ही आग टॉवर वर असलेल्या कनेक्तर ने अचानक पेठ घेतल्याने शॉट शर्किट झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here