धुळीच्या साम्राज्याने माखलेले रस्ते अन गुदमरलेला श्वास ! हाच काय माणगावकरांचा विकास.समस्त जनतेला पडलाय प्रश्न ?

35
धुळीच्या साम्राज्याने माखलेले रस्ते अन गुदमरलेला श्वास ! हाच काय माणगावकरांचा विकास.समस्त जनतेला पडलाय प्रश्न ?

धुळीच्या साम्राज्याने माखलेले रस्ते अन गुदमरलेला श्वास ! हाच काय माणगावकरांचा विकास.समस्त जनतेला पडलाय प्रश्न ?

धुळीच्या साम्राज्याने माखलेले रस्ते अन गुदमरलेला श्वास ! हाच काय माणगावकरांचा विकास.समस्त जनतेला पडलाय प्रश्न ?

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगाव शहरात तसेच अंतर्गत वस्तीत पाण्याची पाईप लाईन घालण्याचे काम चालू आहे रोडवरून दररोज हजारो नागरिक ये जा करत असतात परंतु पाईपलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी मातीचे ढीगारे तसेच दगडाचे ठोकळे हे ठेकेदारांनी रस्त्यावर साठवून ठेवले आहे ते रोडच्या बाजूला व्यवस्थित रित्या न केल्याने वाहतुकीला अडचण तसेच वाहनांची गर्दी होत आहे , वाहन चालक, वाहतुकीसाठी होणारी अडचण त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना व स्कूल बस चालकांना आणि जनतेला या धुळीचा नाहक त्रास होत आहे. पाईपलांईनचे खोदकाम केलेल्या प्रत्येक परिसरात नेहमीच धूळ पसरत असल्याने लोकांचा श्वास गुदमरतोय. या धुळीमुळे रस्त्याकडेच्या खिडक्या कायमस्वरुपी बंद ठेवण्याची वेळ लोकांवर आली आहे.

माणगावातील कचेरी रोड विकास कॉलनी हा मुख्य रस्ता असल्याने हे ते शासकीय ऑफिस साठी दररोज वाहनांची तसेच नागरिकांची कायमस्वरूपी वर्दळ होत असते या कॉलन्यांमधील घरांच्या खिडक्या कायमच बंद दिसतात. अनेक घरांच्या कंपाऊंड व भिंती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माखलेल्या पाहायला मिळतात. तसेच दुकानदारांना या धुळीचा त्रास सहन करावा लागतो या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. लहान मुलांचेही श्वास या धुळीमुळे गुदमरतो आहे. बाहेरून येणारे पर्यटक सुट्टीसाठी क्रिसमस, ३१ डिसेंबर या साप्ताहिक सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांना अंतर्गत रस्त्यावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहने चालवत असताना होणारी वाहनांची गर्दी असल्यामुळे वाहनधारकांना प्रवास करताना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे दुचाकी धारकांना पुढच्या मोठ्या गाडीच्या मागे वाहन चालवताना धुळीचा मारा सहन करावा लागत आहे समोरून येणारे वाहन याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे स्थानिक प्रशासन, माणगाव नगरपंचायत, अन्य शासकीय यंत्रणा अन्यथा संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करून माणगावच्या जनतेला या रोजच्या रोज जीवघेण्या प्रवासातून दिलासा द्यावा अशी मागणी खास करून होत आहे.