*बाळाराम इमारतीजवळील शौचालय बंद असल्याने जनतेची गैरसोय: जनसेनेचा निवेदनाद्वारे पाठपुरावा*
संदेश साळुंके
मुबई
९०१११९९३३३
मुंबई:- सर ज. जी. समूह रुग्णालयातील बाळाराम इमारतीजवळील सार्वजनिक शौचालय गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात जनसेना सामाजिक संस्था यांनी अधिष्ठाता व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत, शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
औषधोपचारासाठी दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री-अपरात्री दूरवर असलेल्या गेट क्रमांक ७ येथे जावे लागते. यामुळे वृद्ध, महिला, लहान मुले यांची विशेषतः गैरसोय होत आहे. बंद शौचालयामुळे परिसरात घाणीचे प्रमाण वाढले असून, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा अभाव आहे.
शौचालयाचे लोकार्पण मा. आमदार यामिनी जाधव आणि मा. नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या हस्ते झाले होते, परंतु अद्याप ते खुले झाले नाही.
बंद असलेले शौचालय रंगरंगोटी व स्वच्छतेसह तातडीने खुले करावे.
रुग्णालय प्रशासनाने शौचालय व्यवस्थापनासाठी सुधारित योजना आखावी. या समस्येवर लवकर तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा जनसेनेने व्यक्त केली आहे. दिनेश पवार, सलीम अन्सारी, आणि अभय चव्हाण यांनी निवेदन सादर केले असून, यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.