बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने युवकाला चाकू दाखवत दिली ठार मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

माध्यमांवर अपमानित भाषेत पोस्ट टाकून सामाजिक भावना दुखविण्याचा प्रकार सुद्धा घडले आहेत. त्यामुळे बजरंग दालच्या कार्यकर्त्यांवर कुठे तरी अंकुश पोलिस प्रशासनाने ठेवावा अशी मागणी सुद्धा सामाजिक लोकांकडून होत आहे.

अमरावती :- तिवसा शहरातील एका बजरंग दालच्या कार्यकर्त्याने युवकाला जबर मारहाण केली होती. याप्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्यादी युवकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हनुमंत ठाकरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बजरंग दालच्या कार्यकर्ताचे नाव आहे. तो सातरगाव मार्गावर असलेल्या ताराई जिम संचालक आहे. फिर्यादी युवकाच्या तक्रारीनुसार काल तिवसा शहराच्या पंचवटी चौकात युवकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादी युवकाने तक्रारीत केला आहे.

तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी आरोपी धीरज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तिवसा बजरंग दालच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचे प्रकार काही नवीन नाहीत. याआधी एका बस चालकालासुद्धा मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. अनेकदा मारहाणीत बजरंग दालचे कार्यकर्ते समोरच असतात. माध्यमांवर अपमानित भाषेत पोस्ट टाकून सामाजिक भावना दुखविण्याचा प्रकार सुद्धा घडले आहेत. त्यामुळे बजरंग दालच्या कार्यकर्त्यांवर कुठे तरी अंकुश पोलिस प्रशासनाने ठेवावा अशी मागणी सुद्धा सामाजिक लोकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here