सौंदड येथे 500 महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.
महिलांनी स्वतःला कमी समजू नये – सरपंच गायत्री इरले

टी बी सातकर गोंदीया जिल्हा प्रतिनिधी

सौंदड:- महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सौंदड ग्रामपंचायत कठीबध्द आहे असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच गायत्री इरले यांनी केले.

ग्रामपंचायत सौंदडच्या वतीने 25 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उदघाटन लोकनियुक्त सरपंच मा. गायत्री इरले यांच्या हस्ते तर सुनिता गोबाडे सरपंच ग्रा. प. फुटाळा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी रंजु गोबाडे सरपंच ग्रा. प. बोपाबोडी, निशा तोडासे, आशा राऊत, मालीनी कऱ्हाडे, रंजू भोई, लक्ष्मीबाई टिकाराम इरले, अंजु इरले, मनोरमा फुंडे, सुरेखा नंदरधने, मिनाक्षी विठ्ठले, अनिता उपरिकर, वर्षा शहारे, कल्पणा गायधने,  वर्षा मांडारकर, शोभा चोपकर,  गुणवंता शहारे यांच्यासह गावातील आलेल्या बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Organizing Haldi Kunku program in the presence of 500 women at Saundad.
यावेळी मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले दरम्यान उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले सोबतच महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन ग्रामपंचायत सदस्य सुदेक्षणा राऊत तर उपस्थितांचे आभार अनिता चुटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here