अपघात कमी करण्यासाठी आम आदमी पक्ष बाबुपेठ च्या पाठपुराव्याला यश

51

अपघात कमी करण्यासाठी आम आदमी पक्ष बाबुपेठ च्या पाठपुराव्याला यश

अपघात कमी करण्यासाठी आम आदमी पक्ष बाबुपेठ च्या पाठपुराव्याला यश

सो. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर : -बाबुपेठ मध्ये होणारे सतत चे अपघात रोखण्यासाठी आम आदमी पार्टी बाबूपेठ ने आंबेडकर चौक येथे गतिरोधक देण्यात यावे या करिता मा. जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी रेटून धरली होती.आंबेडकर चौक हा रहदारीचा परिसर असल्याने तिथे गतिरोधक ची अत्यंत आवश्यकता होती. परंतु संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्षपणामुळे आज पर्यंत येथे अपघात होत होते ही गोष्ट जेव्हा आप चे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्या सोबत वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे आज आंबेडकर चौक येथे गतिरोधक चे काम पूर्ण झाले असून आम आदमी पार्टी चे राजू भाऊ कूडे व कार्यकर्ता यांच्या कार्याचे सर्विकडे कौतुक केले जात आहे..