कोठारीतील फरार संरपंचा मूळे ग्रामपंचायतींची कामे खोळंबली
तलाठ्यांच्या कारवाही चे सर्वत्र कौतुक
रेती तस्करी प्रकरण
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- कोठारी नाल्यातून रेती तस्करीत अडकलेले कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे 20 जानेवारी पासून फरार असल्याने ग्रामपंचायत मधील गावकऱ्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत
कोठारी नाल्यातून रेती तस्करी करतांना तलाठी महादेव कन्नाके यांनी दोन ट्राक्टर पकडले पकडलेल्या ट्राक्टरला पोलीसात जप्त करण्याचे ट्राक्टर मालकाला सांगण्यात आले मात्र सरपंच मोरेश्वर लोहे संतोष लोनगडगे व ट्राक्टर ड्रायव्हर यांनी तलाठ्यांसी हुज्जत घालून जबरदस्तीने ट्राक्टर घेऊन पसार झाले या बाबत तलाठ्याने कोठारी पोलीसात तक्रार दाखल केली ठाणेदार तुषार चव्हाण यांनी तक्रारींची दखल घेत सरपंच मोरेश्वर लोहे संतोष लोनगडगे व ट्राक्टर ड्रायव्हर राकेश भोयर अजय पेंदोर यांचेवर 353..379 ( 34 ) अन्वये गुन्ह्याची नोंद केली तेव्हापासून सरपंच सहीत चारही आरोपी पसार झाले होते त्यातील दोघे ड्रायव्हर राकेश भोयर व अजय पेंदोर यांनी पोलीसात आत्मसमर्पण केले असता त्यांची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली व सरपंच मोरेश्वर लोहे संतोष लोनगडगे अजूनही फरार आहेत यामूळे बल्लारपुर तालूक्यात रेती माफीया मध्ये चांगलीच दहशत पसरली आहे रेती तस्करी करायची व महसुल अधीकाऱ्यांसी मूजोरी करुन जबरदस्तीने ट्राक्टर घेऊन पसार होने सरपंच्यास चांगलेच महागात पडले गावचा सरपंच हा गावातील प्रथम नागरिक असतो त्यांच्याकडुन गावात चालणाऱ्या अवैध धंद्याना आळा घालुन शाशनाच्या अधीकाऱ्यांना मदत करणे अपेक्षित असते गावकऱ्यांच्या समस्या दूर करीत गावचा विकास साधने व गावातील अवैध धंद्याना प्रतीबंध करीत शाशनाला सहकार्य करणे
क्रमप्राप्त असताना स्वताच सरपंच अवैध धंद्यात गूंतल्याने व शासकिय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याने गावातील अवैध धंद्याना आळा कोण घालणार असा सवाल गावकऱ्यात व शासकीय अधीकाऱ्यात निर्माण झाला आहे गावच्या सरपंचाकडुनच शासकीय मालमत्तेची तस्करी होत असल्याने इत्तरांना रानं मोकळे झाले होते रेती तस्करीत अडकलेले सरपंच 20 जानेवारी पासून फरार असल्याने गावातील विकासकामे व गावकऱ्यांची कामे खोळंबली आहेत गावातील नागरिक आपले वयक्तीक कामे घेउन रोज ग्रामपंचायत मध्ये येत आहेत मात्र सरपंच नसल्यामुळे कोणतेही कामे होत नाहीत ..परीणामी गांवकरी त्रस्त झाले आहेत सरपंचाचा कारभार कुणाकडेही हस्तांतरित झाला नसल्याने गावातील सगळीच कामे थांबली आहेत