मुंबईमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान वाद वाढतच जात आहे.

मीडिया वार्ता न्युज
२९ जानेवारी २०२२:
मुंबईमधील मालवणी परिसरातील एक खेळाच्या मैदानाला काँग्रेसचे नेता अस्लम शेख यांच्याकडून टिपू सुलतान असे नाव देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु ह्या खेळाच्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव द्यायला भाजप पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार विरोध झाला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराला विरोध करत सांगितले कि, मैदानाला टिपू सुलतान सारख्या हजारो हिंदूंच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या माणसाचे नाव देण्यास आमचा विरोध असेल. विहिंप आणि बजरंग दलाकडून मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात जाऊन रास्ता रोको आणि काँग्रेस विरोधी नारे देत आंदोलन केले.
अस्लम शेख यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत म्हटले कि, स्थानिकांकडून गेल्या १५ वर्षांपासून ह्या मैदानाला टिपू सुलतान मैदान म्हणून संबोधले जाते. ह्याअगोदर भाजपच्या आमदारांनीसुद्धा इथे विकासकामांचे प्रकल्प राबवले होते. त्यावेळी कुणीही विरोध केला नव्हता. मग आता विरोध का होतोय?
आपकी अपनी पार्टीच्या तुसलीजी गुप्ता यांनी मांडले परखड मत

काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या हस्ते मालवणीतील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या निर्णयाला जो भाजपकडून जोरदार विरोध केला जात आहे, हे केवळ राजकारण करण्यासाठी केले जात आहे. येत्या काही महिन्यातच मुंबईमध्ये निवडणूक होणार आहे. मुंबईतील सामान्य जनतेसमोर अनेक समस्या आहेत. शहरातील वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला वाहतूक, संरक्षण, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील सोयी- सुविधा पुरेशा ठरतील अश्याप्रकारे अद्यावत करणे गरजेचे आहे. ह्याबाबती मुंबईकरांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याची गरज आहे. परंतु सध्या लोकांच्या मूलभूत समस्यांना डावलून टिपू सुलतानच्या नावाने राजकीय पक्ष चुकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्ट परखड मत आपकी अपनी पार्टीचे मुंबई प्रवक्ता तुलसीजी गुप्ता यांनी मांडले आहे.