भारतातील तरुण का म्हणत आहेत Justice For Army Students?

62
भारतातील तरुण का म्हणत आहेत जस्टीस फॉर आर्मी स्टुडंट्स?

सिद्धांत
२९ जानेवारी २०२२: सध्या सोशल मीडियावर भारतातील तरुण भारतीय लष्कर भरतीतील गोंधळाबद्दल जोरदार आवाज उठवत आहेत. भारतीय लष्कर भरतीसाठी घेतली जाणारी कॉमन प्रवेश परीक्षा गेल्यावर्षी २८ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ह्या परीक्षेसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही नवीन सूचना न आल्याने परीक्षार्थी तरुण आपला विरोध सोशल मीडियावर नोंदवत आहेत.

प्रशासनातर्फे देशभर लष्कर भरतीसाठी मेळावे भरविण्यात आले होते. देशभरातील अनेक युवकांनी याद्वारे भरतीसाठी आपले अर्ज भरले होते. ह्या अर्जाची छानबिन केल्यानंतर निवडक तरुणांना कॉमन प्रवेश परीक्षेसाठी देशातल्या विविध केंद्रावर बोलावले जाते. परंतु गेल्या २ वर्षांमधे प्रशासनाद्वारे परीक्षा घेण्यात आलेली नाही.

आपण हे वाचलंत का?

 

भरती केंद्रावरून भरती प्रक्रियेची पुरेशी माहिती मिळत नाही, असा परीक्षार्थींचा आरोप आहे. गेल्या १२ महिन्यात तब्बल ६ वेळा हि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी लटकले आहे.

भारतीय सैन्याला भासतेय सैनिकांची कमतरता
राज्यसभेमध्ये प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अजय भट्ट यांनी सांगितले होते कि, भारतीय लष्करामध्ये तब्बल १.१३ लाख जवानांची कमतरता भासत आहे. ह्यामध्ये भारतीय हवाई दल आणि नाविक दलाचा देखील समावेश आहे. असे असूनसुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सैन्यातील रिक्त जागा भरल्या जात नसल्याने देशभरातील तरुणांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.