बौद्ध सर्कल समिती घुग्घुसतर्फे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन थाटात संपन्न
सामाजिक व आर्थिक पाया मजबूत करा- राजरत्न आंबेडकर
साहिल सैय्यद
9307948197
घुग्घुस : येथिल बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त वतीने बोधिसत्व विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन दिनांक २६ व २७ जानेवारी रोजी नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीच्या परिसरात करण्यात आले होते.
शुक्रवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता धम्मदेशना व धम्म संमेलनाचे उदघाटन उदघाटक व मुख्यमार्गदर्शक पु. भन्ते करुणानंद थेरो (औरंगाबाद), पु. भन्ते धम्मानंद पु. भन्ते धम्मबोधी थेरो पु. भन्ते श्रद्धारक्खित, पु. भन्ते संघरतन, पु. भन्ते रत्नमणि थेरो यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटक पु.भन्ते करुणानंद थेरो हे धम्मदेशनेमध्ये म्हणाले, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलेचे व आर्य अष्टांगीक मार्गाचे पालन करून शील सदाचाराचे आचरण करणाऱ्या व्यक्तीलाच जीवनाचे खरे सुख व आंनद प्राप्त होते हे गाढव, कोल्हा व सिंहाच्या उदाहरणाने अत्यंत सोप्या भाषेत पटवून दिले.
दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत परिसंवाद विषय भारतीय संविधाना समोरील आव्हाने व उपाययोजना कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर बावलकर जेष्ठ साहित्यीक (तेलंगाना) प्रमुख वक्ते प्रा. संजय मगर फुले शाहू आंबेडकरी विचारवंत (ब्रह्मपुरी), विशेष अतिथी आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख पाहुणे महाप्रबंधक वेकोलि वणी क्षेत्र आभासचंद्र सिंह, सेंट थॉमस चर्च घुग्घुसचे पास्टर रेव्ह. मार्कोस खांडेकर, गुरुद्वारा कमेटीचे अध्यक्ष सरदार संम्मत सिंह दारी, इंदिरा गांधी महाविद्यालय घुग्घुसच्या संचालिका शहनाज पठाण, श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर उपस्थित होते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सायंकाळी ४ ते ६ पर्यंत परिसंवाद विषय जागतिकीकरणाच्या युगात बौद्धांच्या स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेची आवश्यकता मुख्य मार्गदर्शक डॉ. राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, प्रमुख उपस्थितीती राज्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा (मुंबई) दिनेश हनुमंते, राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा (मुंबई) विजय बंसोड, संचालक आवाज इंडिया टी. व्ही. चॅनल अमन कांबळे, संचालक प्रबुद्ध युवा इंटरनॅशनल फोरम (भद्रावती) नाना देवगडे उपस्थित होते मुख्य मार्गदर्शक डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले, बौद्धांनी केवळ राजकारणाकडे लक्ष न देता सामाजिक व आर्थिक पाया मजबूत करावा असे आवाहन केले. पुढील २५ वर्षात बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प केला.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. विकास राजा यांच्या वैचारिक प्रबोधनाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
शनिवार, २७ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विषय भारतीय संविधान स्त्रियांच्या सर्वांगीण उत्थानाचा मार्ग कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी विचारवंत (अमरावती) डॉ. वामन गवई, प्रमुख वक्ते नागपूर हायकोर्ट ऍड. स्मिता ताकसांडे, माजी समुपदेशक राष्ट्रीय महिला आयोग (नवी दिल्ली) नागपूर ऍड. अंजली साळवे, आंबेडकरी साहित्यिक (अमरावती) प्रा. सिमा मेश्राम (मोरे), फुले शाहू आंबेडकरी साहित्यिक (अमरावती) प्रा. नंदा तायवाडे उपस्थित होते यांनी सखोल मार्गदर्शन केले.
दुपारी ४ वाजता विषय युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग व आंबेडकरी चळवळीमध्ये युवकांची भुमिका कार्यक्रमाचे अध्यक्ष असीस्टंट डायरेक्टर टाऊन प्लॅनिंग (मुंबई) डॉ. ललित खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर साहेबराव येरेकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात संगीतमय वैचारिक प्रबोधनाच्या मेजवानीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.धम्म संमेलनाला शहर वासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला.