चंद्रपूर येथे खैरे कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा : आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन

स्वीटी गेडाम 

चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी

मो: 7498051230

चंद्रपूर :-खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूरच्या वतीने मातोश्री सभागृह, तुकूम, चंद्रपूर येथे – विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी आयोजकांच्या वतीने आ. सुभाष धोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

        या प्रसंगी अध्यक्षस्थानी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोली डायटचे प्राचार्य धनंजय चापले, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर प्रमुख अतिथी विजयराव वाकुलकर, गणेश आरेकर, माजी नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे, नंदकिशोर वांढरे, करण देवतडे, डॉ राजीव धानोरकर, डॉ. आसावरी देवतडे, डॉ. बि के लोणारे, डॉ. भालचंद्र फलके, पिपरे जी, मनोज कळदकर, डॉ. विरेंद्र कोल्हे, सौ. शुभांगीताई धोटे, कार्यक्रमाचे आयोजक उपाध्यक्ष रोहिणी वाकुलकर, सचिव जे. डी. पोटे, सहसचिव दिनकर ठोंबरे, कोषाध्यक्ष नामदेव लढी, डॉ. बी. के. लोणारे, अरुण भोयर, प्रा. सुधाकर पांडव, वृषाली धोटे यांच्यासह इंजिनिअर श्रीकांत भोयर, अरुण वाकुलकर, प्रा. नीलेश ढेकरे, विठ्ठल धोटे, अमरदीप खोडके, पुंडलिक आरिकर, विलास कोळसे, विलास खडसे, विलास फलके, नोमाजी झाडे, अमोल विटाळे, चंद्रभान चिंचाळकर, विजय बोरीकर, धनंजय पाल, मनोज झाडे यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here