नवऱ्यानेच केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; काही तासातच आरोपी अटक
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
मो: 9011199333
कर्जत: २८ जानेवारी रोजी सौ. कविता शेखर रोकडे वय ३५ वर्षे राहणार साई सावली बिल्डींग नानामास्तर नगर कर्जत ह्या त्या रोड वरून स्कुटी वरून फिर्यादी यांच्या घरी जात असताना फोन आला म्हणून गाडी उभी करून मोबाईलवर बोलत असताना. कोणीतरी अध्यात इसमाने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडच्या च्या साह्याने मारहाण केले व पळून गेला. कविता रक्ताच्या थारोळ्यात तशीच पडून होती एका इसमाने रिक्षात घालून तिला कर्जत येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. खेदाची बाब म्हणजे कर्जत प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये दोन रुग्णवाहिका असून त्यांच्या ब्याटऱ्या नादुरुस्त असून एम्ब्युलंस बंद आहेत असे समोर आले आहे. म्हणून तुन्गेकर यांच्या एम्ब्युलंस बोलावण्यात आली. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलीस निरीक्षक गरड व त्यांच्या टीम ने तात्काळ विलंब न लावता पंचनामा करून आपले सूत्रे हलवली व प्राथमिक माहितीच्या आधारे समोर आले की कविता व तिच्या नवरा यांचे लग्न २० वर्षा पूर्वी झाले होते त्या दोघांचे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे म्हणून कविता हिने मा. कर्जत न्यायालयात घटस्पोट घेण्यासाठी दावा दाखल केला होता. हा राग मनात घेऊन शेखर रामचंद्र रोकडे आरोपी (पति) याने कविता केस मागे घेत नसल्याने अंधाराचा फायदा हेत जेथे सी सी ती व्ही नाहीत ह्याचा फायदा घेत. लोखंडी हत्याराने कविताच्या डोक्याच्या मागे वार करून गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व पळून गेला परंतु पोलिसांनी शेखर रामचद्र रोकडे याच्या मुसक्या आवळ्या व त्यास रात्रीच जेर बंद केले. पुढील तपास पोलीस उप विभागीय अधिकारी विजय लागारे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.स.ई. गावडे करीत आहेत.