महिला आघाडी हि शिवसेनेची ताकद आहे – रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी

59

महिला आघाडी हि शिवसेनेची ताकद आहे – रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी

संदेश साळुंके

कर्जत रायगड प्रतिनिधी

मो: 9011199333

नेरळ: शिवसेनेत महिला आघाडी हि पक्षाची खरी ताकद असून कोणी किती बोलले तरी शिवसेनेची महिला आघाडी आजही भक्कम आहे असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी केले. महिला आघाडी हि शिवसेनेची ताकद असून सर्व महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देऊन पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्यावा अशी सूचना जोशी यांनी केली. नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मध्ये सुवर्णा जोशी बोलत होत्या.  

सालाबादप्रमाणे शिवसेना ठाकरे नेरळ शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात येतो. शहर मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाला महिला आघाडीच्या रायगड जिल्ह्याच्या संघटिका कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी तसेच कर्जत पंचायत समिती माजी सभापती सुजाता मनवे, कर्जत तालुका संघटिका करुणा बडेकर ,तालुका संपर्क प्रमुख सुमन लोंगले, उप तालुका संघटिका कल्पना चव्हाण, तसेच सुलभा भोसले,प्रीती देसाई,नीता हनुमंते,ग्रामपंचायत सदस्य शारदा साळेकर,पार्वतीबाई पवार,तसेच पूजा घोंडविदे,मेघा बैकर,रेश्मा शिंदे,राखी गुरव,माधुरी पवार,अंजली, प्रीती आढाव,रुचिता वझरकर,सुजाता मोहिते,रश्मिका शेलार,सुषमा लोंगले आणि अक्षता उतेकर आदी महिला पदाधीकारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी महिला कार्यकर्त्यांना सुवर्णा जोशी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे यश पुन्हा कायम ठेवण्यासाठी महिला वर्गाने आता घराघरात जाऊन महिलांची भेट घ्यावी अशी सूचना केली. त्याचवेळी त्या त्या घरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पक्ष फोडून गेलेल्यांनी कसा अन्याय केला याची माहिती देऊन जनतेच्या मनात असलेली सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देखील जोशी यांनी दिला. 

यावेळी शिवसेना शाखा कार्यलयात आयोजित कार्यक्रमाला उप जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,युवासेना कर्जत तालुका अधिकारी प्रथमेश मोरे,उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे,उप तालुका संघटक सुधाकर देसाई,विभागप्रमुख अल्पेश मनवे,संपर्क प्रमुख चिंधु बाबरे,संदेश लाड,महेंद्र शिंदे,उप शहर प्रमुख बाबू चव्हाण अरुण सालेकर,संतोष सारंग, राहुल भाटकर, ओमकार खडे, प्रविण बाबरे,आदी सह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.